डोबिंवलीत भव्य प्रदर्शन विक्री सोहळा यशानंतर दुसरे भव्य प्रदर्शन मुलुंड येथे 23 आणि 24 एप्रिलला
दिनांक ९ आणि १० एप्रिल रोजी पहिल्यांदाच ‘आम्ही गिरगांवकर’ आणि ‘हायफाय क्रीएशन्स’ यांच्या सयुंक्त विद्यमाने ब्राह्मण सभा, डोंबिवली पूर्व येथे भव्य प्रदर्शन विक्री सोहळा यशस्वी आयोजन करण्यात आला .ह्या सोहळ्याs विविध नामवंतानी हजेरी लावली .
अनेक मराठी उद्योजक घडविलेत ते ‘आम्ही गिरगांवकर’ या समूहाने. ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!’ या ओळींचा अवलंब करत ‘आम्ही गिरगांवकर’ टीम मेंबर्स’नी तीन वर्षांपूर्वी गौरव सागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आम्ही मुंबईकर मराठी उद्योजक चळवळ या व्हाट्सएप समूहाची निर्मिती केली. आप्तस्वकीय, मित्रमंडळी, हितचिंतक अशा सर्वांना एकत्र आणून सर्व मराठी उद्योजकांना आपल्या व्यवसाय वाढीसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा समूह चा उद्देश आहे.
या समूहाचे आताच्या घडीला मुंबई शहरात २१ समूह तयार झालेत व मुंबई बाहेर महाराष्ट्रात पुणे, नाशिक, कोल्हापूर तसेच महाराष्ट्राबाहेर गुजरात मधे बडोदा येथेही समूह सुरु झाले आहेत. तसेच आणखीही सुरु होण्याच्या मार्गांवर आहेत. सर्व मराठी उद्योजकांना एकत्रित करून समूहामार्फत त्यांच्या व्यवसायाची जाहिरात, प्रसिद्धी मिळवून देणे, एकमेकांच्या सहकार्याने अंतर्गत व्यवसाय करून वृद्धी करणे तसेच वेळोवेळी उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून योग्य प्रशिक्षण देणे हा मुख्य उद्धेश असून यासाठी समूह सदैव कार्यरत असतो. तसेच आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे काही देणे लागतो ही सामाजिक भावना ठेऊन या समूहातर्फे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, आदिवासी पाड्यातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रमही समूहातर्फे राबविले जातात.
या समूहा कडून दुसरा भव्य प्रदर्शन विक्री सोहळा मुलुंड पूर्व येथे स्टेशन समोर दत्तात्रय अनेक्स मध्ये दिनांक 23 आणि 24 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे.
याद्वारे मराठी व्यवसायिक उद्योजकांना थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जरूर भेट देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ज्या मराठी व्यावसायिकांना प्रदर्शनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी खालील नंबर वर आयोजकांशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे आम्ही गिरगांवकर समूहात ज्या मराठी उद्योजकांना दाखल व्हायचं असल्यास संपर्क करू शकता त्यांना घर असलेल्या विभागानुसार समूहात समाविष्ठ करून घेण्यात येईल.
आयोजक संपर्क
योगेश होनराव
+91 9867899169
चंद्रशेखर साटम
+91 9819303294
अदिती साटम
+91 7021543253
प्रशांत लटके
+91 9167460458
अमोल रणशिंगे
+91 9167999052

