ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

लॉकडाऊन लागण्याचा धोका वाढला- बूस्टर डोस घेण्याचा सल्ला


मुंबई – देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन सर्वानी सावध गिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे दरम्यान महाराष्ट्रात साडेतीन हजार सक्रिय कोरोना रुग्ण असून आज एकाच दिवशी ९२६ नव्या रुग्णांची महाराष्ट्रात नोंद झाली त्यामुळे लॉक डॉन लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे तज्ज्ञांनी कोरोनाला घाबरू नये असे आवाहन केले आहे. हा कोरोना नवीन नसून देशात लॉकडाऊन लागू होणार नाही, असे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले. डॉ. गंगाखेडकर हे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका अदा केली होती.

डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले की, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याबद्दल माध्यमांनी वार्तांकन करणे बंद केलं पाहिजे.१४० कोटी लोकसंख्येच्या तुलनेत आता समोर येत असलेले बाधितांचे आकडे नगण्य आहेत. त्यामुळे अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी म्हटले.
सध्या ज्या व्हेरिएटंमुळे बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहेत, तो कोरोनाचा प्रकार नवा नसल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाच्या प्रसारामुळे देशात कुठेही लॉकडाऊन लागणार नसल्याचा अंदाज वर्तवताना मृत्यूचा आकडा वाढणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, ज्यांचे वय अधिक आहे, ज्यांना असाध्य रोग आहे अशाच नागरिकांचे दुर्दैवाने याच्यामध्ये बळी जाऊ शकतात. मात्र, त्याचे प्रमाणही अतिशय कमी असेल असेही त्यांनी म्हटले.
डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले की, दहा नव्या लसी जगभरामध्ये येत आहेत. या नव्या लसी कोरोनाविरोधात लढण्यासाठी ‘मॅजिक’ असल्यासारखे काम करतील. आपल्या सरकारनं जे आता उपाय हाती घेतले आहेत ते दुसऱ्या लाटे मध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारावर आहेत. म्हणून कुणीही घाबरून जाऊ नये, असेही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले.
बॉम्बे रुग्णालय तसेच कोव्हिड टास्क फोर्स सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी बुस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. कोविड रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र आता पुन्हा वाढत आहेत. अशात बूस्टर डोस ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी ते घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल तरी तुम्हाला कोविड होऊ शकतो. मात्र आजाराची तीव्रता असते हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. को-मॉर्बिडिटीच्या रुग्णांना अधिक होता असतो. अशात त्यांनी बूस्टर डोस घ्यावा असे त्यांनी म्हटले.

error: Content is protected !!