ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विमान वाहतूक मंत्र्यांचा इंडिगो एअर लाईन्सला इशारा

दिल्ली – राची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात चढण्या पासून रोखण्यात आल्यामुळे, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे चांगलेच संतापले आहेत. या प्रकरणी त्यांनी चौकशीचे आदेश देऊन कारवाईची इशारा दिला आहे.
इंडिगो एअर लाईन्सच्या राची – हैद्राबाद विमानात चडण्यापासून एका दिव्यांग मुलाला रोखण्यात आले होते . त्यामुळे त्याच्या पालकांनीही प्रवास करण्यास नकार दिला होता. मात्र या घटनेने मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे [ डी जी सी ए ]] प्र्मुख अरुण कुमार यांनी सांगितले कि या प्रकरणी इंडिगो कडून अहवाल मागवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत इंडीगोला विचारले असता प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो निर्णय घेण्यात आला होता. एक दिव्यांग मुलाला त्याच्या कुटुंबासह विमानात चढता आले नाही कारण तो मुलगा विमानात चढायला घाबरला होता. म्हणून त्याला प्रवास नाकारण्यात आला . या बाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो . मात्र त्यांच्या दिलगिरीने नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात असे वर्तन सहन केले जाणार नाही . कोणत्याही व्यक्तीने अशा परिस्थितीतून जाऊ नये असे मला वाटते म्हणूनच माझ्या स्वताच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी सुरु आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या सोशल मिडीया अकौंट वरून व्यक्त केली आहे. आणि हा एक प्रकार इंडीगोला इशाराच आहे.

error: Content is protected !!