चित्रपटाच्या टीझरचां प्रदर्शन सोहळा
धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन सोहळ्यात सलमान सारख्या बदनाम माणसाला महत्व दिले जावे आणि सलमानने सुधा आपली आंनंद दिघे सारख्या महान व्यक्तीशी तुलना करण्याचा प्रयत्न करावा हे काही बरोबर नव्हते . शिवाय या कार्यक्रमाला नेहमी कॅमेऱ्याच्या शोधत असलेले राज ठाकरेंच्या भाषेत काही लवांडे बसले होते त्यांना आनंद दिघेंच्या सहकाऱ्यांना भेटण्या पेक्षा त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून दिघे साहेबाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्या पेक्षा अर्ध वस्त्रतल्या ललना सोबत हस्तांदोलन करण्यातच अधिक इंटरेस्ट दिसत होता .