ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी


दिल्ली / संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी 11 एप्रिल रोजी येणार आहे .महाराष्ट्रात शिवसेना फुटून शिंदे गटाने भाजपशी सोयरिक करून सरकार बनवले होते यावेळी मुळ शिवसेना पक्षाने एकनाथ शिंदे सह 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस विधान सभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याना केली होती. पण फुटिरणी बहुमताच्या आधारे झिरवरळ टार्गेट करून त्यांच्यावर अविश्वासाच्या ठराव आणला होता .पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तिथे सुरुवातीला 3 न्यायधिषांच्या खंडपीठ समोर सुनावणी झाली त्यानंतर हे प्रकरण घटना पीठाकडे वर्ग करण्यात आले.तिथे नामवंत कायदे तज्ञ कपिल सिब्बल,अभिषेक मनु सिंघवी यांनी ठाकरेंच्या बाजूने तर हरीश साळवे आणि इतर दोन ज्येष्ठ वकिलांनी शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यानंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता त्यावर गुरुवारी निकाल लागणार आहे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

error: Content is protected !!