पराभव समोर दिसताच निवडणूक आयोगाकडे धाव -भाजपचा रडीचा डाव- निकाल लांबणीवर
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत पराभव समोर दिसताच भाजपने नेहमी प्रमाणे कपट नीतीचा अवलंब करीत महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत ती मते बाद करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे आणि त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीचा निकाल वेळेवर जाहीर होऊ शकला नाही.
काल राज्यसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत ठरल्या प्रमाणे अनिल देशमुख आणि नवाब मलिक सोडून सर्व आमदारांनी मतदान केले दरम्यान काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतदानाच्या नंतर आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिल्याबद्दल त्यांचे मत बाद करा अशी मागणी भाजपने केली तसेच याच प्रकारे शिवसेनेचे सुहास कांदे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मतदानाच्या नंतर मतपत्रिका त्यांच्या पक्षाच्या पोलिंग एंजट ला दाखवल्या बद्दल त्यांची मत रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली . त्यामुळे काँग्रेसने सुधा सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची मतं पत्रिका आशिष शेलार यांना दाखवल्या बद्दल त्यांचे मत रद्द करावे तसेच रवी रण यांचेही मत रद्द करावी अशी मागणी केली त्यामुळे 5 वाजता सुरू होणारी मतमोजणी थांबवण्यात आली भाजपच्या दाबामुळे मतमोजणी थांबल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे .