शनिवारपासून राज्यातील शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश
मुंबई/ड्रेस कोड वरून कर्नाटक शिक्षण विभागामध्ये जबरदस्त वादंग मजून ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याची घटना ताजी असतानाच, आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १५ जून पासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहे .त्यानुसार पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो .२०२४/२५ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटा मार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून दिले जाणार आहेत .एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलींना सोमवार बुधवार व शुक्रवारी आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक. तर स्काऊट व गाईड गणवेश मंगळवार गुरुवार व शनिवार गडद निळ्या रंगाचा ओव्हर लॉक फ्रॉक असेल. इयत्ता पाचवीतील मुलींसाठी सोमवार बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट. स्काऊट साठी मंगळवार गुरुवार शनिवार गडद निळ्या रंगाचा ओव्हर लॉक फ्रॉक. सहावी ते आठवी मुली आणि पहिली ते आठवी मुली उर्दू माध्यम नियमित गणवेश सोमवार बुधवार व शुक्रवार आकाशी निळ्या रंगाची कमीच निळ्या घडत रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी. स्काऊट गाईड साठी मंगळवार गुरुवार व शनिवार गडद आकाश निळ्या रंगाची कमीज गडद निळ्या रंगाची सलवार गडद निळ्या रंगाची ओढणी .पहिली ते सातवी मुले नियमित गणवेश सोमवार बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाच रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅट स्काऊट गाईड मंगळवार गुरुवार शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅट आठवी मुले सोमवार बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पँट. स्काऊट व गाईड मंगळवार गुरुवार शनिवार तील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुलपॅट अशी एकंदरी गणवेशाची योजना असेल