ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्घटना ग्रस्त पोरसे गावातील पिढीत कुटुंबांना मदतीचा हात


खेड/ अतिवृष्टी मध्ये ज्या खेड तालुक्यातील पोस्ट गावच्या बौद्ध वाडीत दरड कोसळून १७गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती धावली आहे.समितीच्या कार्यकारिणी मधील सदस्यांनी स्वतः दुर्घटना ग्रस्त भागाला भेट देऊन तिथल्या दुर्घटनाग्रस्त १२० धान्याची किट ,१२० कव्हर मध्ये प्रत्येकी ५०० रुपयांची आर्थिक मदत,कपडे,मोठ्यांना चपला,लहान मुलांना शूज,रेनकोट छत्री आदींची मदत केली आहे.आर्थिक सहाय्य करणाऱ्या या टीम मध्ये योगेश मोरे
,कपिल कांबळे,गणेश मोहिते,मंगेश मोरे,दशरथ जाधव,राज म्रचंड ,सचिन कांबळे,,जयेश कदम,सुभाष सोनवणे,प्रभाकर यादव,शिवशंकर ढ्ब्गडे ,स्वप्नील चव्हाण,सूरज साळसकर,पर्जित मोहिते,सहील कांबळे,राहुल जाधव,दीपक मोहिते,आदित्य मोहिते,राजेश म्रचंड, धनंजय मोडक यांचे मोठे योगदान होते.
रायगड मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये खेड तालुक्यातील पोस्ट येथील बौध्द वाडीतील ९ घरांवर दरड कोसळून १७ जनाचा मृत्यू झाला होता
.

error: Content is protected !!