ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एशियन ग्रॅनिटोची एस्ट्रोन पेपर मधील भागीदारी संपुष्टात

मुंबई, ११ ऑगस्ट, २१: भारतातील आघाडीच्या टाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने त्याच्या संबंधित कंपनी- एस्ट्रोन पेपर आणि बोर्ड मिल्स लिमिटेड मधील संपूर्ण १८.८७ टक्के हिस्सा ४६.९४ कोटी रुपयांना विकला आहे. कंपनीने १० ऑगस्ट २०२१ रोजी ५३.५ रुपये प्रति शेअर दराने ब्लॉक डीलद्वारे अॅस्ट्रॉन पेपरचे ८७.७५ लाख इक्विटी शेअर्स विकले. एस्ट्रॉन पेपर शेअर्सच्या विक्रीतून जमा झालेल्या ४६.९४ कोटी रुपयांचा वापर एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडच्या दीर्घकालीन कार्यरत भांडवलासाठी आणि व्यवसाय विकास गरजांसाठी केला जाईल. एस्ट्रॉन पेपर शेअर्सच्या विक्रीतून भांडवल एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडसाठी करमुक्त असेल.

यावेळी बोलताना, एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमलेश पटेल म्हणाले, “टाइल आणि बांधकाम साहित्याच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आमच्या मुख्य क्षमतेमध्ये गुंतवणूक करणे आणि अॅस्ट्रॉन पेपरमधील भागभांडवल विकणे अत्यंत महत्वाचे आहे. वर्षानुवर्षे, कंपनीने ऑपरेशनल कार्यक्षमता वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले, ज्यामुळे मजबूत कामगिरी कंपनी करू शकली.

error: Content is protected !!