भाजपा खंबीरपणे भूमिपुत्रांच्या पाठीशी रहाण्यास कटिबध्द
मुंबई/आज भलेही मुंबई महानगर जगातली एक मोठी बाजारपेठ आणि देशाची आर्थिक राजधानी असली तरी इथला जो मुळ रहिवाशी भूमिपुत्र आहे त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक तितके प्रयत्न झालेले नाही .त्यामुळे आजही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,आरेचे जंगल आणि संपूर्ण मुंबईच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव,समुद्रावर उपजीविका असलेले आणि मुंबईच्या समुद्र किनारी असलेल्या कोळी वाड्यांमध्ये राहणारे कोळी बांधव गावठाणात राहणारे मराठी आणि ईस्ट इंडियन.हे सगळे मुंबईचे मुळ रहिवाशी आहे आणि यांच्याच घामावर व श्रमावर ही वैभवशाली मुंबई उभी आहे पण आज या लोकांची राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेकडून अपेक्षा होत आहे.वास्तविक संपूर्ण जगात आज स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आणि झालेल्या चुका सुधारण्यासाठी आंदोलने होत आहेत.पण मुंबईवर ज्यांचा खरा हक्क आहे अशा इथल्या मुल रहिवाशांच्या समस्यांकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही मात्र भाजपा इथल्या भूमिपुत्रांच्या आर्थिक,सामाजिक आणि न्यायिक हक्कासाठी लढण्यास कटिबध्द आहे असे भाजपा नेते बाबूभाई भवानजी यांनी सांगितले. मूळ निवासी दिनाचे औचित्य साधून इथल्या मूळ रहिवाशांच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की मुंबईच्या या मूळ रहिवाशांना आज आर्थिक समस्या,नागरी सुविधा ,रोजगार,सुरक्षा अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत त्यासाठी झगडावे लागत आहे मात्र त्यांच्या या न्याय हक्काच्या लढ्यात त्यांना सर्व तक्तिनिशी पाठींबा देण्यासाठी भाजपा कटिबध्द आहे असे माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी जाहीर केले आहे त्यामुळे आर्थिक,सामाजिक,आणि सांस्कृतिक जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या या भूमिपुत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे