ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाकरे विरुद्ध ठाकरे राडेबाजी सुरू


तर महाराष्ट्रात या लोकांना सभा घेऊ देणार नाही राज ठाकरेंचा इशारा
संभाजी नगर/बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून सुपारी बाज चले जाओ अशा घोषणा देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाविरुद्ध आता मनसेही चांगलीच आक्रमक झालेली आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि शेन फेकले त्यामुळे आता ही राडेबाजी आणखी वाढत जाणार असल्याचे दिसत आहे
हिंगोलीत राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सूपार्‍या फेकून सुपारी बाज म्हटल्याचा राग मनसैनिकांना जबरदस्त आलेला आहे त्यामुळे शनिवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन आहे त्यामध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी ठाण्यात आलेले उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण आणि बांगड्या फेकल्या या प्रकरणी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या सगळ्या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी संभाजीनगर मध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला केला आरक्षण हे आर्थिक निकषावर असायला पाहिजे अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे असे असताना महाराष्ट्रात आरक्षणाच्या अडून पवार आणि उद्धव ठाकरे दंगली घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केला . ते म्हणाले की बारामती येथील एका कार्यक्रमात मोदी म्हणाले होते की शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो मग असे असेल तर मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी मोदींकडे का शब्द टाकला नाही असा सवाल ही त्यांनी केला .त्याचबरोबर पवार म्हणतात महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते पवार असं का म्हणाली तेच कळत नाही .उलट महाराष्ट्रात शांतता आहे असे असताना या ठिकाणी कोणाला मणिपूर सारख्या दंगली घडवायचे आहेत का महाराष्ट्राची शांतता बिघडवयाची आहे का हे सर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. जरांगे पाटलांच्या पाठीशी कोण आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहित पडलेले आहे त्यामुळे माझी महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्माच्या बांधवांना एकच विनंती आहे की या सर्वांच्या नादाला लागू नका असे राज ठाकरे यांनी सांगितले

error: Content is protected !!