ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा ताफा अडवला – काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी


सोलापूर :मराठा आंदोलक आता प्रचंड आक्रमक झाले आहेत . महाराष्ट्राच्या सौर्यावर असलेल्या राज ठाकरेंना जाब विचारल्यानंतर आज त्यांनी शरस पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यानाही जाब विचारला
मराठा आंदोलक आता प्रचंड आक्रमक मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांना अगोदर कुर्डूवाडीजवळ या आंदोलकांनी अडवले. या वेळी त्यांना मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर बार्शीत शेतकरी संवाद मेळाव्यातही पवार हे भाषण करीत असताना या प्रश्नावर आंदोलकांकडून पवारांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. याच वेळी एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा सारा घटनाक्रम पाहता मराठा आरक्षण प्रश्नावर आता पवार यांनाही रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते.
पवार हे रविवारी बार्शी येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यासाठी जात असताना कुर्डूवाडीजवळ अंबड (ता. माढा) येथे मराठा आंदोलकांनी त्यांना अडवले. या वेळी त्यांनी पवारांकडे मराठा आरक्षणाबद्दल विचारणा केली. यावेळी पवार यांनी मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचे सांगितले मात्र त्यावर आंदोलकांचे समाधान झाले नाही. तुम्ही खूप दिवसांपासून मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगता. मात्र जाहीरपणे भूमिका स्पष्ट करीत नाहीत, अशा शब्दात या कार्यकर्त्यांनी पवार यांना विचारणा केली. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाबाबत आंदोलने केली जात आहेत, त्याबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी. ते लोक आपल्या पक्षाचे आहेत की मराठा आंदोलक आहेत, हेही सांगावे, असाही आग्रह या आंदोलकांनी धरला..

error: Content is protected !!