ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत ? सोमय्यांचा सवाल .


   मुंबई -किरीट सोमय्या यांनी दि -९ च्या पत्रकार परिषेदत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. पत्रकार परिषद अजित पवार पासून सुरु करायची की शरद पवारांपासून सुरु करायची या संभ्रमात आहे, असं सोमय्या म्हणाले. अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत ? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. सातशे कोटींचं कर्ज घ्यायचं असेल तर त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन 1 हजार कोटी असलं पाहिजे. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले. 65 कोटीच्या व्हॅल्यूएशनवर 700 कोटींचं कर्ज काढलं?, शरद पवार साहेब यासाठी तुम्हाला सहकार चळवळ हवीय का? असा सवाल सोमय्यांनी केला.

सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं.

error: Content is protected !!