ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ठाणे

उल्हासनगरात ऐतिहासिक बाळासाहेब ठाकरे मिनी स्टेडियम.–पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

Title -:
.उल्हासनगर / किरण तेलगोटे -क्रीडाप्रेमींच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती करताना बाळासाहेब ठाकरे मिनी स्टेडियम उल्हासनगरात उभारण्यात येणार असून नगरविकास तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्टेडियमचे भूमिपूजन करण्यात आले आहे.यासोबतच मलशुद्धीकरण केंद्र,ड्रेनेज स्वच्छ करणारा रोबोट,विद्यार्थ्यांना सायन्स शैक्षणिक किट,अत्याधुनिक बोटींचा लोकार्पण सोहळा देखील एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी राष्ट्रपती पदक विजेच्या अग्निशमन दलाच्या 4 जवानांचा सत्कार देखील करण्यात आला.13 हजार स्केअर मीटरच्या भव्य जागेत हे स्टेडियम येत्या दोन वर्षात उभारण्यात येणार आहे.त्यात फुटबॉल,लॉनटेनिस,व्हॉलीबॉल,बास्केटबॉल,कॅरम,बॅडमिंटन,बिलिअर्ड,स्नुकर, जिम्नॅशियम,स्विमिंगपुल असणार असून बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे म्युझियम आहे.स्टेडियम मध्ये ऑलांपिक दर्जाचे खेळ होणार आहेत.हे काम झा.पी.ग्रुप ऑफ कंपनी देण्यात आले आहे.शिवसेना विकासकामा राजकारण करत नाही.उल्हासनगरचा विकास हेच मिशन असून विकासकामांसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना एमएमआरडीए कडून निधी दिला जाणार असे स्पष्ट करताना ठाण्यात क्लस्टरचा निर्णय घेतला.उल्हासनगरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी दंड कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यामुळे शहरवासीयांना लवकरच अधिकृत घर मिळणार असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रपती पदक मिळू शकते,त्याच प्रमाणे उल्हासनगरचे खेळाडूही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करतील असा ठाम विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.भरपूर निधी देण्यात आला आहे.रस्ते चांगले करा तीच खरी शहराची ओळख असल्याचे शिंदे म्हणाले.मात्र आता कोविडशी दोन हात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य पूर्णपणे तयार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यामुळे फक्त एका वर्षात तब्बल सव्वादोनशे कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.बाळासाहेब ठाकरे मिनी स्टेडियम बाबत 10 वर्षांपासूनचा पाठपुरावा एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे.उल्हासनगर विकासाची कात टाकत असल्याचे प्रास्ताविक शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे यांनी केले
.

error: Content is protected !!