ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवाशांचा आक्रोश..

 भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने  बहुसंख्य ठिकाणी  ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या पनवेल – डहाणू, दिवा – वसई ट्रेन बंद असल्याने भिवंडीत येणारे कामगार, व्यापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज  रेल्वे प्रवाशांनी ट्रेन सुरु करण्यासाठी आक्रोश करीत  मागणी केली  आहे.पनवेल – डहाणू, दिवा – वसई या ट्रेन दिवसातून पाच वेळा  धावत असतात त्यामुळे भिवंडीत येणाऱ्या हजारो  कामगार, व्यापाऱ्यांना काहीही त्रास नव्हता मात्र गेल्या दिड वर्षांपासून कोरोना मुळे ट्रेन  बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून ट्रेनमधून येण्यासाठी 20 रुपये मोजावे लागत असताना आता खाजगी वाहनाने तीनशे पेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहे त्यात वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत असल्याने शासनाने भिवंडी रोड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या ट्रेन सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी यांनी केली आहे..

error: Content is protected !!