ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

इंडिया आघाडीत फूट ? हरयाणात ,काँग्रेस – आप वेगवेगळे निवडणूक लढवणार


भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत विरोधकांना फायदाही झाला. त्यानंतर इंडिया आघाडी वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुकीतही एकत्र निवडणुका लढेल, असं बोललं जात होतं. मात्र, आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये बिनसल्याची चर्चा आहे. कारण आम आदमी पक्षाने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे हरियाणात आम आदमी पार्टीने ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याचं बोललं जात आहे.
आपने सोमवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवार जाहीर केले. एवढंच नाही तर हरियाणामध्ये ५० जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. आम आदमी पार्टीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यामुळे नेमकी कोणाला फटका बसणार? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आप’ने जाहीर केलेले २० उमेदवार कोण आहेत? आणि कोणत्या २० मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत?आम आदमी पार्टीने २०१९ च्या निवडणुकीत १२ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, ‘आप’ला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. एवढंच नाही तर त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. यामध्ये भिवानी, रानिया, डबवली, उचाना कलान, असंध, कलायत, बदली, महेंद्रगड, सोहना, बल्लभगड आणि बेरीचा यांचा समावेश होता.
आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या नारायणगड, असंध, उचाना कलान, समलखा, मेहम, बादशाहपूर, रोहतक, बदली, बेरी, महेंद्रगड, डबवाली आणि बहादूरगड यासह १२ जागांवर काँग्रेसने आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने आधीच जवळपास ४१ उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, ‘आप’ने जाहीर केलेल्या २० जागांपैकी सध्या काँग्रेसकडे नऊ, भाजपाकडे सहा आणि ‘जेजेपी’कडे दोन, तर चार जागांवर अपक्ष आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने राज्यात एकूण ४६ जागा लढवल्या होत्या. मात्र, ‘आप’ला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं

error: Content is protected !!