अमिताभला शुभेच्छा
अमिताभचे यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे. तरीही टीव्हीवर, सिनेमात, जाहिरातीत, इव्हेंट्समध्ये, सरकारी उपक्रमात, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर असा तो सर्वसंचारी आहे. अगदी तरुणपणी त्याला हवाईदलात जायची इच्छा होती. सात हिंदुस्तानी, आनंद, प्यार की कहानी, रास्ते का पत्थर, बंधे हाथ, एक नजर, बन्सी बिरजूमधला अमिताभ नवखा, पण उत्कट होता. तो स्टाइलाइज्ड झाला नव्हता. ‘भुवन शोम’ या देशातील पहिल्या समांतर सिनेमास त्याने आपला आवाज दिला. पण स्वत: मात्र समांतर सिनेमाकडे पाठ फिरवली. मात्र त्याची अभिरुची उच्च दर्जाची आहे. दिलीपकुमार व वहिदा हे त्याचे आवडते कलावंत आहेत. तो उत्तम सतार वाजवतो आणि प्रभावीपणे कविता सादर करतो. देव आनंद वा राजेश खन्नाप्रमाणे तो फक्त स्वप्रेमातच बुडालेला नाही. इतरांच्या अभिनयास फुले व चिठ्ठी पाठवून तो दादही देतो. त्याने सर्वाधिक दुहेरी-तिहेरी भूमिका केल्या आहेत. आजही तो रेलेव्हंट वाटतो. माझ्या, म्हणजे बाबू मोशायच्या ‘शहेनशहा अमिताभ’ या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दलचे वेगळे विश्लेषण वाचायला मिळेल. अमिताभला शुभेच्छा!- हेमंत देसाई