ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीय

मावळ गोळीबारानंतर उत्तर प्रदेश बंद होता का?

मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला होता का? जी घटना झाली त्याचा निषेध व्यक्त व्हायलाच हवा, पण महाराष्ट्राला वेठीस का धरता? लॉकडाऊन उठवण्यासाठी तुम्हाला हफ्तेही द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली दुटप्पी भूमिका? लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त असताना आता बंदची गरज आहे की नाही हे आधी पटवून द्यायला हवे. लोकांनी बंद उत्स्फूर्तपणे पाळला पाहिजे. महाराष्ट्र सरकारचे पोलिस जर दुकाने बंद करायला फिरत असतील, तर जनतेच्या मनात काय आहे ते दिसतेय आणि आम्ही जनतेबरोबर आहोत, असे संदीप देशपांडे म्हणाले.

संसदेत शेतकरी कायद्याचे बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते? शिवसेना खासदारांची थोबाडे बंद का होती? शरद पवार संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीचे दिवस आहेत, या काळात थोडा बहुत व्यापार होतो. अशा दिवसांत तुम्ही शासन पुरस्कृत बंद करत आहात. दादरमध्ये पोलिस लोकांची दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत? पोलिस वापरावे लागत आहेत. पोलिस दुकाने बंद करीत आहेत, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

error: Content is protected !!