बाळासाहेबांचे नाव फितुरानी पळवले- शिवसेनेला मशाल!
दिल्ली/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्या मध्ये नाव आणि निवडणूक चिन्ह यावरून जो वाद होता तो निवडणूक आयोगाने त्यांच्या पद्धतीने संपवला आहे.शिंदे गटाला नाव मिळाले आहे बाळासाहेबांची शिवसेना तर उद्धव गटाच्या शिवसेनेला नाव मिळालं आहे . उद्वव बाळासाहेब शिवसेना तसेच शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे .
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं गोठवल्या नंतर दोन्ही गटांना शिवसेना आणि बाळासाहेब यांचे नाव वापरायला मज्जाव केला होता तसेच दोन्ही गटाना त्यांच्या पक्षासाठी नावे आणि चिन्ह कोणती हवीत ते कळवायला सांगितले होते .त्यानुसार शिवसेनेने तीन नावे कळवली यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे,शिवसेना बाळासाहेब प्रबोधन ठाकरे,आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे आणि मशाल,उगवता सूर्य, व त्रिशूळ ही चिन्हे मिळावीत असे कळवले होते . पण रात्री शिंदे गटाची बैठक झाली आणि त्यांनीही शिवसेना बाळासाहेब ठाकरे,शिवसेना बाळासाहेब प्रबोधन ठाकरे ही दोन नावे तसेच तुतारी,गदा आणि तलवार ही चिन्हे निवडणूक आयोगाकडे पाठवली . त्यावर निवडणूक आयोगाने काल शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले आहे . मात्र शिंदे गटाला आज निवडणूक चिन्ह दिले जाणार आहे अर्थात हा निर्णय अंतरिम आहे .