ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अंधेरी पोट निवडणुकितील संघर्षाला सुरुवात- शिंदे गटाला ढाल तलवार


मुंबई/शिंदे आणि ठाकरे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या अंधेरी पोट निवडणुकीतील संघर्षाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण दोन्ही गटांना निवडणूक पक्षांची नावे आणि निवडणूक चिन्हे मिळाली आहेत शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर काल निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह दिले आहे .त्यामुळे अंधेरी पोट निवडणुकीत मशाल विरुद्ध ढाल तलवार यांच्यातील सामना रंगणार आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर या चिन्हाचा कशाप्रकारे प्रसार आणि वापर करून निवडणूक जिंकायची याचे आडाखे बांधले जात आहे .शिवसेनेने मशालीची पूजा करायला सुरुवात केली आहे काल शिवतिर्थावर राज्याच्या अनेक भागांत मशालीची पूजा करण्यात आली तर रायगडावरून शेकडो शिवसैनिक मशाल घेऊन मातोश्रीवर पोचले.मशाल चिन्ह घराघरात कसे पोचवायचे यासाठी शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत तर काल शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून सुधा ढाल तलवार चिन्हाचा प्रसार आणि प्रचार सुरू झालेला आहे आणि आता प्रत्यक्ष पोटनिवडणुकीत आणखी या चिन्हांचा वेगाने आणि आक्रमकपणे परचार केला जाणार आहे . दरम्यान धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

error: Content is protected !!