रतन टाटांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – एका सुंसंस्कृत उद्योग युगाला देशवासियांचा टाटा
मुंबई – टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांच्यावर गुरुवारी, ऑक्टोबर रोजी मुंबईतील वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे ठेवण्यात आले होते. येथून त्यांची अंत्ययात्रा वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचली.त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. वयाच्या ८६ व्या वर्षी बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. त्यांना वयोमानानुसारचे आजार होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मुकेश अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह राजकारण, क्रीडा आणि व्यवसायातील अनेक व्यक्तींनी टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांनी लिहिले, ‘एक युग संपले.’त्यांच्या निधनाने भारतातील एका महान सुसंस्कृत युगाचा अंत झाला आहे.