ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हेलिकॉप्टर किती सुरक्षित?


भारताचे हवाई दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आणि हवाई दलाकडे वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ आणि मालवाहू विमाने तसेच हेली कॉफ्टर आहेत त्यातील बहुतेक ही विदेशी बनावटीची असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण आहेत. असे असतानाही लष्कराच्या हेली कॉफ्टरणा वारंवार अपघात होणे ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल.बुधवारी तामिळनाडू मधील कुन्नुर येथील भीषण अपघाताने पुन्हा एकदा वयुदलातील वेगवेगळ्या प्रकारच्या हेली कॉफ्टरच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कारण बुधवार ज्या एम आय १७ व्ही ५ या लष्करी हेली कॉफ्टरला अपघात झाला त्या अपघातात भारताच्या तिन्ही दलाचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी आणि अन्य ११लष्करी अधिकारी कर्मचारी मारले गेले.आता हा अपघात होता की घातपात हे चौकशी अंती उघड होईल.मात्र ज्या अर्थी या हेलिकॉप्टर मधून बिपिन रावत यांच्यासारखा सर्वोच्च लष्करी अधिकारी प्रवास करीत होता त्या अर्थी टेक ऑफ पूर्वी या हेलिकॉप्टरची तपासणी केलेली असणार आणि त्यात कोणताही दोष नसल्याचे आढळल्या नंतरच टेक ऑफला परवानगी दिली गेली असणार तरीही मग सुरक्षेबाबत एवढी काळजी घेऊनही जर अपघात होत असतील तर हा प्रश्न गंभीर आणि चिंताजनक आहे.टेक ऑफ नंतर काही वेळातच या हेलिकॉप्टर चां ए टी सी अर्थात हवाई नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला आणि ते कोसाळण्या पूर्वी त्याला आग लागली असे प्रथमदर्शनी ज्यांनी ही घटना पहिली त्यांचे म्हणणे आहे.कदाचित आग लागल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे आणि नंतर त्याचे तुकडे झाले असावेत.त्यामुळे यात घातपाताचा संशय येतोय.अर्थात हेलीकॉफ्टार चां ब्लॅक बॉक्स सापडलेला असल्याने अपघाताचे कारण लवकरच तपासात पुढे येईल पण लष्कराच्या हेलिकॉफरणा अशा तऱ्हेचे वारंवार अपघात होत असल्याने आता तरी सरकारने हेलिकॉप्टर क्या तांत्रिक बाबी आणि सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करायला हवा .११ऑगस्ट २००३ मध्ये ओ एन जी सी चे हेलिकप्टर अरबी समुद्रात कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता.२सप्टेंबर २००९ मध्ये आंध्र प्रदेश सरकारचे हेलिकॉप्टर कुरूनुल येथे कोसळून त्यात मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू झाला होता ३० ऑगस्ट२०१२मध्ये जामनगर येथे दोन हेलिकॉप्टरची टक्कर होऊन ९ जन प्राणास मुकले होते.२०१६ मध्ये सुकणा मिलिटरी बेसवर चीतह हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता ६ऑक्टोबर२०१७ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग जवळ हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता.२७ जून२०१८ मध्ये नाशिक लष्कराच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण हेलिकॉप्टर जाळून खाक झाले होते सुदैवाने यात जीवित हनी झाली नव्हती.त्याच वरची जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा लष्कराच्या चितह हेलिकॉप्टर ला अपघात झाला.तर आसाम मधील मजुली जिल्ह्यात लष्कराच्या लढाऊ हेलिकॉतरला दोन वैमानिकांचा मृत्यू झाला २०१९ मध्ये पुन्हा चीताह भुतांन मध्ये अपघात होऊन दोन पायलट मृत्यूमुखी पडले २०२० मध्ये चिताह हेलिकॉफ्टारला पुन्हा अपघात झाला तर २०२१ मध्ये उधमपूर भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून दोन्ही पायलट मारले गेले आणि बुधवारी कुण्णुर chya अपघातात दस्तुरखुद्द सी डी एस बिपिन रावत यांच्यासह १३जणांचा बळी गेला हे सगळ भयंकर आहे त्यामुळे हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व लष्करी हेलिकडतर ची तांत्रिक सक्षमता तपासून बघणे आवश्यक आहे केवळ लष्करी नव्हे तर खाजगी कंपन्या आणि राज्य सरकारे यांनीही त्यांच्याकडे असलेल्या हेलिकॉप्टर चां सर्व तांत्रिक बाजू तपासायला हव्यात

error: Content is protected !!