वरळीतील कार्निवल बारवर पोलिसांची धाड
मुंबई – दिवंगत आर आर पाटील यांनी लेडीज बार बंद करणारा कायदा करून लाखो लोकांचं संसार वाचवले होते. आज ते हयात नसले तरी महाराष्ट्रातील लेकीबाळी त्यांना दुवा देत आहेत . मात्र मुंबई सारख्या ठिकाणी आजही पोलिसांबरोबर आर्थिक सेटिंग करून काही ठिकाणी लेडीज डान्स बार सुरु आहेत . पोलिस समाज सेवा शाखेला मिळालेल्या माहितीवरून दोन डिसेंबरला रात्री या बारवर धाड टाकली यामध्ये मुली , ग्रिन्हाईक व मॅनेजरला यांना अटक केली. समाज सेवा शाखेचे एसीपी चंद्रकांत जाधव यांच्या मार्ग दर्शना खाली समाज सेवा शाखेचे अधिकारी यांनी हि कारवाई करण्यात आली . त्यामुळे वरळी भागातील अनेक महिलांनी आणि सामाजिक संघटनांनी समाजसेवा शाखेच्या पोलिसांचे आभार मानले आहेत .
.