ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

वाहनांच्या सुरक्षा नियमांमध्ये वाढनियम न पाळल्यास १० हजार दंड

मुंबई – महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलीये. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना ३१ मार्च २०२५ पर्यंत उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक असणार आहे. 1 एप्रिल २०२५ पासून ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट नसेल त्या वाहक चालकांवर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
हाय -सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचा हा नियम राज्यभरात लागू होणार आहे. या नियमानुसार जवळपास २० दशलक्षाहून अधिक वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. वाहन मालकांना सध्याच्या स्थितीत असलेली नंबर प्लेट बदलून हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावावी लागणार आहे.
जर वाहन चालकांनी या आदेशाचे पालन केले नाही तर मोटार वाहन कायद्यांतर्गत 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे.एच एस आर पी नसलेल्यांसाठी वाहनांना वाहन नोंदणी आणि पत्ता बदलणे यासारख्या मिळणाऱ्या सेवा देखील बंद केल्या जाणार आहे. एच एस आर पी उपक्रमाचा उद्देश वाहनांची सुरक्षा वाढवणे आहे. ज्यामुळे चोरीला गेलेली वाहने परत मिळवला येतील.

error: Content is protected !!