कुर्ला – बस अपघातातील मृतांची संख्या ७ मृतांच्या कुटुंबियांना राज्याकडून ५ तर केंद्राकडून २ लाखांची मदत
मुंबई – सोमवारी कुर्ला रेल्वे स्थानकात बेस्टच्या ३३२ क्रमांकाच्या बसच्या अपघातात मृतांची संख्या ७ झाली असून ४२ लोक जखमी आहेत त्यांच्यावर भाभा , तेच अंधेरीत उपचार सुरु आहेत . राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख तर केंद्राकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बस ड्रायव्हर पोलिसांच्या अटकेत आहे
झालेल्या या अपघातात आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावेही समोर आली असून मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कनीस अन्सारी ( वय ५५ ), आफरीन शाह ( वय १९ ), अनम शेख ( वय २० ) , शिवम कश्यप ( वय १८ ), विजय गायकवाड ( वय ७० ), फारूख चौधरी ( वय ५४ ) आणि अन्य एकाच्चा असे मिळून ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यापैकी चौघे हे कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल होते तर एक कोहिनूर रुग्णालयात आणि अन्य एक मृत व्यक्ती हबीब रुग्णालयात होती. या सहा जणांच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरलेला नाही.