ई डी चे पालिका अधिकाऱ्यांकडे का दुर्लक्ष?
मुंंबई–३० हजार कोटींचा बजेट असलेली मुंबई महानगर पालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे.मात्र जेवढी मोठी संस्था तेवढेच मोठे झोल हे आता समीकरण झालेले आहे.पालिकेतील घोटाळे काढण्यासाठी कुठले आरटीआय टाकायची गरज नाही. पालिकेतील लोकच एकमेकांचे कारनामे उघडकीस आणतात.पण शेवटी चोर चोर मौसेरे भाई अशातला प्रकार असल्याने अजून तरी कोणावर कठोर कारवाई झालेली नाही आणि यापुढेही होण्याची शक्यता नाही किरीट सोमय्या रोज पालिकेच्या नावाने बोंबलतोय पण त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही.त्यामुळे पालिकेतील घोटाळेबाजांना रान मोकळे मिळाले आहे.आज पालिकेतील कनिष्ठ अभियंता पासून पालिका आयुक्तां पर्यंत सगळेच करोडपती आहेत .पण आयकर विभाग किंवा ई डी यांचे मात्र या पालिका अधिकाऱ्यांकडे लक्ष कसे जात नाही तेच काळात नाही.कधी कधी असा संशय येतोय की पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आयकर विभाग आणि ई डी चां अधिकाऱ्यांनाही म्यानेज करून ठेवले आहे की काय?स्थायी समितीमध्ये जे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले जातात ते खरोखरच मुंबईकरांच्या नागरी सुविधांसाठी असतात की पालिका अधिकारी आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी असतात याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी आता मुंबईकर करीत आहेत. नुकताच विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिकेचा पे अँड पार्क घोटाळा उघडकीस आणलेला आहे.यात पालिकेचे १०० कोटींचे नुकसान झाले असा थेट आरोप रवी राजा यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे.रवी राजा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि पालिकेत त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पक्ष शिवसेनेसोबत सटेत आहे असे असताना त्यांनी केलेले आरोप निश्चितच खरे असणार.किरीट सोमय्या हे विरोधी पक्षातील असल्याने एकवेळ त्यांच्या आरोपात राजकारण असू शकेल पण रवी राजा हे तर महा विकास आघाडीत आहेत असे असतानाही त्यांनी पालिका प्रशासन आणि अप्रत्यक्षरीत्या मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर जो आरोप केलाय तो निश्चितच खरा असणार त्यामुळे पे अँड पार्क मधील घोटाळ्याची तातडीने चौकशी व्हायला हवी.वास्तविक पालिकेतील एखाद्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले की आयकर विभागाने ताबडतोब त्याच्यावर धाड टाकली पाहिजे तसे झाले तर पुराव्यानिशी बेहिशोबी मालमत्ता सापडू शकेल पण पालिकेतील अधिकारी आणि त्यांचे आर्थिक पाठीराखे असलेले कंत्राटदार यांच्यावर आयकर खाते तसेच अमल बजावणी संच्णालय अर्थात ई डी इतकी वर आयकर आणि ई डी नेअनेक नेत्यांवर धाडी टाकून त्यांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली मग पालिका अधिकारीच आयकर आणि ई डी ला कसे दिसत नाहीत.आज बहुतेक पालिका अधिकाऱ्यांचे थंड हवेच्या ठिकाणी बंगले आहेत.मुंबईत पॉश एरियात आलिशान फ्लॅट आहेत गावी आणि इतर ठिकाणी जमीन जयदाद आहे.आणि हा सगळा अर्थातच हरामाचा पैसा आहे म्हणूनच या लोकांकडे सुधा आयकर आणि ई डी ने लक्ष द्यायला हवे .अनीथा त्यांच्या विषयी लोकांच्या मनात जो संशय आहे तो अधिक गडद होईल.पालिकेच्या कुठल्याही विभागातील कामाचे टेंडर आर्थिक सेटलमेंट शिवाय पास होत नाही आणि यात अर्थातच पालिका अधिकारी लोकांचा मोठा वाटा असतो.त्याशिवाय टेंडर पासाच होत नाही.आणि मुंबईत महिन्याला अब्जावधींची कामे निघतात मग पालिका अधिकाऱ्यांची किती कमाई असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.आयकर किंवा ई डी कडे याची माहिती नाही असे होऊच शकत नाही मग या तपास यंत्रणा गप्प का ? नेतेच भ्रष्टाचारी असतात का? कारण नेत्यांकडून येणाऱ्या फायली या अधिकारी लोक पास करीत असतात.त्यामुळे कामाच्या रकमेच्या तुलनेत कोणाला किती टक्केवारी हे सगळ अधिकाऱ्यांच्या हातात असते .आणि प्रत्येक कंत्राटदार लोकांशी अधिकाऱ्यांचे घनिष्ट लागेबांधे असतात त्यामुळे काही ठराविक लोकांचीच टेंडर पास केली जातात.हा सगळा झोल आयकर आणि ई डी चां लोकांना ठाऊक नाही का ? मग का ते डोळे मिटून बसलेत?
आज काल लोकही इतके बेफिकीर झालेत की त्यांना हे सगळ दिसत असताना कुणाला विचारायची हिम्मत नाही जाऊदे आपल्याला काय करायचे आहे असे म्हणून प्रत्येक जन अशा घोटल्यांकडे दुर्लक्ष करतो अरे पण या घोटाळ्यात अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या घशात जाणारा पैसा आपला आहे मुंबईकरांचा आहे त्यामुळे हे घोटाळे आपण डोळे मिटून पहातच राहायचे का? कुणीतरी कधीतरी यावर आवाज उठवयलाच हवा आणि आयकर तसेच ई डी सारख्या तपास यंत्रणांना जाब विचारायला हवा की तुम्हाला नेत्यांचेच भ्रष्टाचार दिसतात का ? पालिका अधिकारी कोण तुमचे जावई लागतात का? त्यांच्या घरावर कधी धाडी टाकणार? त्यांच्या बेहिशोबी मलमतेची कधी चौकशी करणार? हे विचारण्याची आता वेळ आली असून मुंबईकरांनी आता तरी जागे व्हावे..