पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
मुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे पे अँड पार्क २५ टक्के महिला बचत गटांना तसेच सुशिक्षित बेरोजगारांना द्यायला हवेत पण पालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हे कंत्राट एकाच बड्या कंत्राटदाराला दिले आहेत आणि महिला बचत गटाच्या नावाखाली काही सब कॉन्ट्रॅक्टर पालिकेची ही पे and पार्क ची कंत्राटे घेऊन पालिकेला चुना लावीत आहेत काही ठिकाणी कांत्रटचा कालावधी संपला तरी पे अँड पार्क मध्ये वसुली सुरू असून त्यात पालिकेचा १०० कोटींचा महसूल बुडल्याचा आरोप करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रवी राजा यांनी केली आहे तर मुंबईतील एका सामाजिक संघटनेने या घोटाळ्याची आर्थिक गुन्हा शाखेकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे .केवळ पालिका आयुक्त या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात हे आम्ही बघतोय अन्यथा या प्रकरणी भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात व्यापक मोहीम छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे तर महापौरांनी पालिका प्रशासनाकडे अहवाल मागवला आहे
बॉक्स
मुंबई जनसत्ता ने यापूर्वीच या पे अँड पार्क घोटाळ्याच्या विरुद्ध आवाज उठवला होता पण पालिकेतील लोक प्रतिनिधी कंत्राटदार आणि भ्रष्ट पालिका अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने हे प्रकरण पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी दाबण्याचा प्रयत्न चालवला होता आता लोकांनी आपल्याकडे बोटे दाखवू नयेत म्हणून महापौरांनी चौकशी अहवाल मागवला असला तरी त्यातून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही .कारण सत्ताधाऱ्यांच्या मदतीशिवाय असे घोटाळे होऊच शकत नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबईकर जनता व्यक्त करीत आहेे.