ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबईविश्लेषण

पानिपतच्या पराभवाचा बदला

लाख मराठा सैन्य धारातीर्थी पडलेल्या पानिपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या जिव्हारी लागला होता. माधवराव पेशव्यांनी बदला घेण्यासाठी महादजी शिंदे,तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले,रामचंद्र कानडे यांच्या फौजा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी रवाना केल्या.
मराठ्यांच्या फौजा त्वेषाने दिल्लीत शिरल्या.मराठ्यांनी दिसेल त्या अफगाण सैन्याला कापायला सुरुवात केली.मराठा फौजांनी लाल किल्याला वेढा दिला.
आक्रमक मराठ्यांच्या पुढे अफगाण सैनिकांनी शरणागती पत्करली.
मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून नजिबखानाचा पुत्र झाबेदाखानला कैद केले.
मराठा फौजा दिल्ली बादशहाच्या दरबारात शिरल्या.दिल्ली बादशहाच्या सिंहासनाचे तख्त महादजी शिंदेंनी फोडले.मराठा फौजांनी शाहआलमला दिल्लीचा बादशहा बनवले.
शाहआलमने मराठ्यांना मुतालिकीची सनद देत दिल्लीचा कारभार सोपविला.
१७७१ ते १७९४ पर्यंत दिल्लीचा कारभार मराठा पाहत होते.
शहाआलमला बादशहा बनवून मराठा फौजा आताच्या हरियाणाच्या दिशेने निघाल्या.पानिपतचे युद्ध जेथे झाले होते तेथे पुन्हा एकदा मराठा ताकद मराठा सैन्याला दाखवायची होती.मराठ्यांनी पानिपत,सोनपत,बागपत,कुंजर, शामली,फत्तरगड,घोसगड,नजिबाबाद सहजरित्या जिंकले.
अब्दालीचा सरदार नजीब खानाने पानिपत युद्धात लुटलेली ३० लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी लुटली.मराठा सैनिकांना कैदेतून मुक्त करत मराठ्यांनी पानीपतच्या पराभवाचा कलंक पुसला.मराठ्यांनी अफगाण सैन्यांची प्रचंड कत्तल केल्याने अब्दालीची पुन्हा भारतात येण्याची हिंमत झाली नाही.
शालेय अभ्यासक्रमात मराठ्यांचा पानिपत युद्धातील पराभव असतो,पण पानिपत युद्धातील पराभवाचा बदला मराठ्यांनी १७७१ साली कितीतरी अधिक मोठ्या प्रमाणावर घेतला होता,हे मात्र शिकवले जात नाही.हिंदूंच्या मनात पानिपत युद्धातील पराभवाचा न्यूनगंड रहावा,हाच मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसी, सोशलिस्ट, लेफ्टिस्ट इतिहासकारांचा उद्देश.
मनोज राणे*
‌ • • •

error: Content is protected !!