ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

नाशिकमध्ये काँग्रेस तोंडघशी- बापाची माघार – बेटा अपक्ष

नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेसने सुधीर तांबे याना उमेदवारी दिली होती पण त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलेच नाही त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि आपण महाविकास आघाडीचाच उमेदवार आहोत असे सांगू लागले इतकेच नव्हे तर पाठींब्यासाठी आपण भाजप नेत्यानाही आग्रह करणार आहोत असे सांगितले आहे त्यामुळे या तांबे बाप बेट्यांमुळे काँग्रेस आणि सत्यजितचे मामा बाळासाहेब थोरात तोंडघशी पडले आहेत
नाशिक, 12 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती, तसंच सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्मही आला होता, पण सुधीर तांबे यांनी फॉर्मच भरला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. वेळेमध्ये एबी फॉर्म आला नाही, म्हणून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले. अपक्ष उमेदवार असलो तरी मी काँग्रेसचाच आहे, असंही सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं.

अपक्ष उमेदवार असलो तरी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पाठिंबा मागणार असल्याचं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, पण शेवटच्या क्षणापर्यंत तांबे पिता-पुत्रांपैकी कोण अर्ज भरणार याचा सस्पेन्स कायम होता. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे हे दोघंही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, पण नेमका उमदेवार कोण? याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती

error: Content is protected !!