गोव्याशी आमचे भावनिक नाते- आदित्य ठाकरे
पणजी – गोव्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली असून आज आदित्य ठाकरे यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदार संघात प्रचार सभा घेऊन त्यांना आव्हान दिले . तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला . ज्यात गोवेकरांसाठी आश्वासनांची खैरात आहे. आज राहुल गांधी यांनीही गोव्यात प्रचार केला .मात्र भाजप उमेदवारांच्या प्रचाराला गोव्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या समोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे स्मृती इराणी आणि भाजप नेते चांगलेच संतापले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदार संघात आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर प्रचार सभा घेतली . यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी गोवा आणि महाराष्ट्राचे किती जवळचे भावनिक नाते आहे ते सांगितले आमची कुलदैवते इथे आहेत . शिवसेनेचा दरारा आणि राजकारण आता गोवेकरांना आवडू लागले आहे. म्हणूनच गोव्यातील भूमिपुत्रांना यावेळी शिवसेना खर्या अर्थाने न्याय देणार आहे.महाराष्ट्रात जसे महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे तसेच काम गोव्यात करून दाखवायचे आहेत गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील काही नेते मंत्री गोव्यात प्रचार करून गेले इतर पक्षाचे नेतेही येत आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिद्धी करून घेत आहेत .मात्र आमचे मुख्यमंत्री कधीही आपल्या बरोबर फोटोग्राफर घेऊन फिरले नाहीत. म्हणून तर गेल्या दोन वर्षांपासून ते टॉप फाईव्ह मध्ये आहेत. मात्र इथे ज्यांचे सरकार होते ते सांगतायत असे करू आणि तसे करू मग दहा वर्ष का नाही काम केले असा सवाल त्यांनी भाजपला केला मी इथे निवनुकीसाठी नाही तर गोवेकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे महाराष्ट्र मोडेल घेऊन शिवसेना रणांगणात उतरली आहे हव हय्लो तुमका मेल्पक असे गोवेकरी भाषेत त्यांनी भाषणाला सुरुवात केली होती आणि लोकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला . दरम्यान आज स्मृती इराणी यासुद्धा गोव्यात प्रचाराला आल्या होत्या आणि त्यांच्या गोव्यात तीन सभा होत्या मात्र त्या गोव्यात येताच शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ताफ्यासमोर येवून घोषणाबाजी केली त्यामुळे स्मृती इराणी यांना तेथून दुसर्या मार्गाने नेण्यात आले सेना भाजपातील हा संगर्ष सुरु असतानाच आज राहुल गांधी यांच्याही चार त्झिकाणी सभा झाल्या यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली आणि गोव्यात कॉंग्रेसचेच सरकार येईल असा दावा केला