माजी आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता ईडी कडून जप्त
पुणे- शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांची 26 कोटी रुपयाची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय -(ईडी) कडून जप्त करण्यात आली.
ठेवीदारांची 71 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर गदा आणली. गैरव्यवहार प्रकरणात ईडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. काळा पैसे हस्तांतर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
भोसले यांच्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मालमत्तेबरोबर एक कोटी रुपयांच्या डिमॅट खात्याच्या इक्विटीच्या रकमेचा समावेश आहे. भोसले यांनी ठेविदारांच्या पैशाचा अपहार करून फसवणूक केली होती. बनावट कर्ज प्रकरणी मंजूर केली होती. ठेवीदारांचे पैसे अन्यत्र व वळविले होते असे ईडी कडून कळविण्यात आले.