ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

अर्थसंकल्प मोठा पण पैशाचा तोटा


मुंबई/ एखादी सुंदर मुलगी पटवल्यावर तिला लग्नाचे वचंन देताना तुला लग्नानंतर सोन्याने मडवीन,बंगला घेईन गाडी घेइन पैठणी साड्या घेईन अशी आश्वासने खिशात विष खायला पैसा नसला तरी द्यावी लागतात .महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे सुधा तसेच आहे महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसा नाही तरीही अर्थसंकल्प मोठ मोठी आश्वासने देण्यात आली आहेत . या अर्थसंकल्पात म्हणे विकासाची पंचसूत्री सादर करण्यात आली आहे . त्यात कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास,दळणवळण आणि उद्योग यासाठी 1लाख 15 हजार 215 कोटी प्रस्तावित आहेत यासाठी येत्या तीन वर्षात 4 लाख कोटी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आहे.कृषी आणि सलग्न क्षेत्रासाठी 23 हजार 888 कोटींची तरतूद आहेआरॉजी क्षेत्रासाठी 5,244 कोटींची तरतूद आहे. ही सगळी आकडेवारी पाहिल्यानंतर महाराष्ट्र किती श्रीमंत आहे असे लोकांना वाटेल मग महाराष्ट्राच्या तिजोरीत येवढं पैसा आहे किंवा एवढं पैसा उभा करण्याची ताकत असेल तर एस टी कामगारांचे सरकार मध्ये विलीनीकरण का करत नाही .चार लाख कोटी कर्ज पैकी अजून 4 कोटींचे कर्ज का फिटले नाही याचे उत्तर सरकारने द्यावे .

error: Content is protected !!