ईडीच्या विरोधात जेलभरो आंदोलन करणार
पुणे – ईडीच्या कारवायांच्या विरोधात ठाकरे गट पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ईडीविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईडीकडून आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी ईडी आणि केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत. तसेच जलभरो आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. ईडीचे सत्यव्रत नावाचे अधिकारी गेले नऊ वर्षे म्हणजेच 2014 पासून ते आजतागायत एकाच पदावर कसे काय राहू शकतात? असा सवाल करत त्यांनी ईडीवर निशाणा साधला आहे
सुषमा अंधारे यांनी ईडी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ईडीचे सत्यव्रत नावाचे अधिकारी गेले नऊ वर्षे म्हणजेच 2014 पासून ते आजतागायत एकाच पदावर कसे काय राहू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकाच विशिष्ट अधिकाऱ्याला सलग नऊ वर्ष एकाच जागी कसं ठेवलं जातं? याचं उत्तर केंद्रानं द्यावं असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे पीए सचिन जोशी नेमके कुठे आहेत? अजय आशर यांना सक्तीच्या रजेवर का पाठवण्यात आलं याचं उत्तर किरीट सोमय्या यांनी द्यावं असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अंधारे यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. जर ईडीच्या यंत्रणेचा गौरवापर थांबला नाही तर आम्हाला ईडीविरोधात जेलभरो आंदोलन करावे लागेल. लवकरच आंदोलनाच्या तारखा जाहीर करू, गरज पडल्यास कोर्टात देखील जाऊ असंही यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.