शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचा विडिओ व्हायरल- दोघांना अटक राजकीय वातावरण तापले
मुंबई – शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून या मागे ठाकरे गट असल्याचा आरोप शीतल यांनी केला आहे
एखाद्या महिलांविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तीच चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं. ती महिला कुठेतरी काम करत असते. तिच्याबद्दल बोलण्यासाठी काही नसलं, तिच्या कामावर कुठेही बोट ठेवण्यास जागा नसली की, तीच चारित्र्यहनन करणं खूप सोपं असतं, असं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. या व्हिडीओ मॉर्फ करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्या असं म्हणाल्या आहेत.
त्या म्हणाल्या की, ”बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पक्षात (शिवसेना) प्रवेश केला होता. तोच विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे निघाले. तेव्हा त्यांच्या बरोबर असणं हे फार आवश्यक वाटलं. त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. तिथून आम्हा महिलांना अतिशय वाईट पद्धतीने बोलणं सुरु झालं. गेले आठ ते नऊ महिने आम्ही अनेक वाईट पद्धतीने ट्रोलिंगला सामोरे जात आहोत. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर अतिशय वाईट पद्धतीने बोललं जात आहे. तरी देखील आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही. आपल्या कामाकडे लक्ष दिलं.”
म्हणल्या की, ”काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागाठणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमाला आले होते. तिथे एक व्हिडीओ काढून, त्यावर चुकीच्या पद्धतीने गाणं टाकून आणि चुकीचा संदेश लिहून मात्रोश्री या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. यानंतर जवळपास एक तासात 350 लोकांनी तो शेअर केला. ठाकरे गटाच्या जवळपास सगळ्याच पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.” ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
शीतल म्हात्रे म्हणाले की, ”जेव्हा ही घटना घडली तेव्हा सगळ्यात पहिला फोन हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आला. मला इतकंच म्हणाले, घाबरू नको तुझा भाऊ तुझ्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. मला वाटतं हाच फरक आहे, म्हणून आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. तिथे आमचं ऐकलं जात नव्हतं, मात्र इथे मागायच्या आधीच आम्हाला बऱ्याच गोष्टी मिळत गेल्या.’