यापुढे मटण दुकानाला हिंदुत्वाचे लेवल
मुंबई/मटन विक्री व्यवसायामध्ये प्रामुख्याने अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य आहे परंतु आता मात्र कमी होण्याची शक्यता आहे कारण मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट ची आवश्यकता असल्याचे सांगून सर्व हिंदू मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट दिले जाईल तसेच ज्याच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल त्याच्याकडूनच हिंदूंनी मटन यावे असे आवाहनही नितेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या आव्हानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे
नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट करून मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले त्यानुसार मटन विक्रीच्या व्यवसायात जास्तीत जास्त हिंदू तरुणांनी यावे यासाठी मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट दिले जाईल आणि त्याच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल अशाच मटन विक्रेत्यांकडून लोकांनी मटन घ्यावे असे नितेश राणे यांनी आवाहन केलेले आहे मल्हार सर्टिफिकेट च्या माध्यमातून हिंदू तरुणांना मटन विक्री व्यवसायात आणण्याचा हा एक प्रयत्न आहे त्यामुळे ते पारंपरिक खाटीक आहेत त्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे तर नितेश राणे यांच्या या योजनेचे सर्व हिंदूंनी स्वागत केले आहे तसेच मोठ्या प्रमाणात हिंदू तरुण या व्यवसायात उतरतील आणि मल्हार सर्टिफिकेट घेऊन मटन व्यवसाय सुरू करतील अशी आशाही व्यक्त केली जात आहे
