ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

वापी आणि मुंबईत आयकर विभागाची छापेमारी


मुंबई – शहा पेपर्स कंपनी ३५० कोटींचा कर बुडवल्याप्रकरणी आयकर विभागाच्या रडारवर आहे. आज आयकर विभागाने या कंपनीच्या मुंबई आणि वापीतील १८ ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात २ कोटींची रोकड आणि २ कोटींचे दागिने सापडल्याचे समजते.
आज सकाळीच आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळेस शाह पेपर्स कंपनीच्या मुंबई आई वापीतील कार्यालयांवर तसेच कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले या छाप्यामध्ये काही महत्वाच्या कागदपत्रांसह २ कोटींची रोकड आणि २ कोटींचे दागिने सापडले आहेत . या कंपनीने शासनाचा ३५० कोटींचा कर बुडवल्याचा कंपनीवर आरोप आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून कंपनीचे सर्व व्यवहार तपासले जात आहेत तसेच कंपनीच्या संचालकांचीही चौकशी सुरु आहे. दरम्यान या कंपनीशी संबंधित आणखी काही कंपन्यांवर आयकर विभागाचे लक्ष असल्याचे समजते

error: Content is protected !!