ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

आपापले बघा- सेनेचा काँग्रेस राष्ट्रवादीला संदेश


मुंबई/ राज्यसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे.त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापले बघा असा संदेश काँग्रेस राष्ट्रवादीला दिला आहे त्यामुळे आघाडीत बिघडी होण्याची शक्यता आहे.
येत्या 20 जून विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीत शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत . पण विधानसभेतील संख्याबळ पाहता 55 सदस्य असलेल्या शिवसेनेचे 2 आमदार सहज निवडून येतील कारण पहिल्या पसंतीसाठी27 मतांचा कोटा आहे .त्यानुसार 27 दूने 54 म्हणजे शिवसेनेला 2 उमेदवार निवडून आणणे सहज शक्य आहे पण राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे काय कारण राष्ट्रवादीचे 54 आमदार असेल तरी मलिक आणि देशमुख तुरुंगात आहेत त्यांना मतदानाचा अधिकार नाही त्यामुळे राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 2 मतांची गरज आहे तर काँग्रेसला 10 मतांची गरज आहे . राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षणी टांग दिल्याने त्यांच्यावर विश्वास नाही त्यामुळे आता आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत या मतभेदाचे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काय परिणाम होणार हा उत्सुकतेचा विषय आहे .

error: Content is protected !!