ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

भाजपच्या घोडेबाजारचां विजय


राजकारणात आजकाल नीतिमत्ता जराही शिल्लक राहिलेली नाही .त्यामुळे काहीही करत्ता येते कुठलेही विधिनिषेध पाळण्याची राजकारण्यांना आवश्यकता भासत नाही.राज्यसभेच्या निवडणुकीत हेच बघायला मिळाले निवडणूक 4 वाजता पार पडली आणि निकाल मध्यरात्री लागला 2017 मध्ये असेच घडले होते तेंव्हाही भाजप आणि काँग्रेस आमने सामने होते आणि यावेळीही काँग्रेसचा सहभाग असलेली महा विकास आघाडी भाजपच्या समोर होती या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही घोडेबाजार होणार नाही असे सांगितले जात होते पण शेवटी घोडेबाजार झाला भाजपने अपक्ष आमदारांनी फोडून आपला तिसरा उमेदवार निवडून आणला हा भाग वेगळा .अर्थात निवडणुकीत जय पराजय असतोच त्यात काही विशेष नाही पण निवडणुकीच्या दिवशी जे घाणेरडे राजकारण बघायला मिळाले ते संतापजनक आणि लोकशाहीला काळीमा फासणारी होते .4 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडल्या नंतर पाच वाजता मतमोजणी सुरू होऊन साधारण अर्ध्या तासात निकाल लग्ने अपेक्षित होते पण तसे झाले नाही.कारण भाजपने महा विकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेऊन ती तीन मते बाद करण्याची निवडणूक आयोगाला विनंती केली आणि त्यानंतर जो मध्यरात्री पर्यंत मत मोजणीच्या खेळ खंडोबा झाला त्याला पूर्णपणे भाजपा जबाबदार आहे असे संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय.भाजपने महा विकास आघाडीच्या ज्या तीन सदस्यांच्या मतदानावर आक्षेप घेतला त्यांनी निवडणुकीतील नीयमा नुसारच मतदान केले होते आणि राज्यसभा निवडणुकीचा नियमानुसार अपक्ष वगळता मोठ्या राजकीय पक्षाच्या आमदार असलेल्या मतदाराने मतदान केल्या नंतर मतपत्रिका त्यांच्या पक्षाचा जो कुणी तिथे पोलिंग ejant असेल त्याला मत पत्रिका दाखवायची असते त्या नुसार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी मतदानाच्या नंतर आपली मतपत्रिका आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवली आणि नंतर मत पेटीत टाकली बस येवढ्या कारणावरून भाजपने आकड तांडव करून निवडणूक आयोगाकडे धाव घेतली त्यामुळे मतमोजणी मध्यरात्री पर्यंत लांबली .असे प्रकार घडणे म्हणजे कुठेतरी लोकशाही मूल्यांची पायमल्ली करण्यासारखे आहे पण 2014 पासून लोकशाहीची पाया मल्ली सुरू आहे आणि या देशातील लोकही संविधानाची पायमल्ली करणाऱ्याच्या मागे फरफटत जात आहेत पण याची फार मोठी किंमत या देशातील लोकशाहीला आणि इथल्या लोकांना चुकवावी लागणार आहे.पहिली गोष्ट म्हणजे राज्यसभा किंवा विधान परिषद ही दोन वरिष्ठ सभागृह 100 टक्के राजकारणी लोकांसाठी नाहीत .तरीही आज राजकारण्यांनी त्याचा ताबा घेतला आहे आणि या सभागृहातही ज्या निवडणुका होतात त्यात मग वर्चस्वाची लढाई सुरू होते संख्याबळ वाढवण्यासाठी घोडेबाजार केले जातात त्यामुळे आता राज्यसभा आणि विधान परिषदेतील राजकीय सदस्यांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही

ठेच लागली माणूस शहाणा होतो असे म्हणतात आणि ते खरे आहे महाविकास आघाडीला ही एक प्रकारे ठेच लागलेली आहे आणि यातून त्यांनी धडा घेणे आवश्यक आहे कारण 8 दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक आहे. त्यातही घोडेबाजार होणार हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे आता पासूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे.जेंव्हा जनतेतून निवडणूक होते तेंव्हा असेल गलिच्छ प्रकार होत नाहीत पण राज्यसभा आणि विधान परिषद या निवडणुका जनतेतून होत नाहीत त्यामुळे लोकप्रतिनिधींना मेनेज करणे खास करून अपक्ष आमदारांना फोडणे सहज शक्य असते इथे आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे ज्या बहुजन विकास आघाडीने भाजपला साथ दिली आहे तेच भाजप वाले आगामी पालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची खाट टाकल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यांना बोट धरायला दिले की ते संपूर्ण हातच कडून घेतात असा त्यांचा आजवरचा राजकीय इतिहास आहे बाळासाहेबांनी त्यांना बोट धरायला दिले त्यामुळे भाजप इथे वाढली सतेपर्यंत पोचली पण पुढे काय झाले ज्या शिवसेनेमुळे हे लोक वाढले त्याच शिवसेनेला हे लोक संपवायला निघाले आहेत . तोच प्रकार वसई विरार मध्ये होणार आहे एकदा का भाजपवाले इथे घुसले की सर्वात प्रथम ते बहुजन विकास आघाडीचे गेम करून वसई विरार ताब्यात घेतील आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना एक तर कायमचे घरी बसवरील नाहीतर कायमचे तुरुंगात बसवरील त्यामुळे अशा लोकांना साथ देऊन बहुजन विकास आघाडीने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे

error: Content is protected !!