ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

खान बहादुर भाभा कुर्ला रुग्णालयात डॉक्टरांची मनमानी -छोट्या संस्थांच्या पोटावर पाय देऊन बड्याना कंत्राटे

मुंबई/ पालिकेतील टेंडर घोटाळे काही नावे नाहीत पण  एखाद्या कामाचे तोंडी टेंडर काढून ते मंजूर करण्याचा भयंकर प्रकार पालिकेच्या भाभा कुर्ला रुग्णालयात सुरू आहे.आणि आता त्याविरुद्ध छोट्या कंत्राटदार सेवा संस्थांनी आवाज उठवून पालिका आयुक्तांकडे रीतसर तक्रार केली आहे  .
       दिनांक ८ जून 2022 बहुउद्देशिय 33 कामगार पुरविण्याच्या कामाच्या कंत्राट बाबत असाच झोल झालेला आहे . नोंदणीकृत आणि पूर्वी चांगली सेवा दिलेल्या संस्थांना काम देण्या ऐवजी सर्व नियम धाब्यावर बसवून ऑफ लाईन आणि तोंडी कंत्राटे दिली जात आहेत या मागे मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याची चर्चा असून ज्या बड्या आणि संबंधित कामाचा अनुभव नसलेल्या  कंत्राटदारांना लेबर पुरवण्याची कंत्राटे दिलीत ती रद्द करून  नियमानुसार काम करणाऱ्या स्थानिक संस्थांना ती द्यावी आणि या तोंडी निविदा प्रकरणात जे अधिकारी गुंतले त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे

: स्थानिक नगरसेविकेचे दबाव
त्यामध्ये सहभागी संस्थांचे टेंडर नुसार कागदपत्रे नसतानाही कामे दिली आहे . व याआधी सुद्धा पाच फूल नोंदणी सहाय्यक  या कामांमध्ये सहभागी संस्थांना पात्र करून कामे बहाल केली आहेत  व ज्या संस्था कागदोपत्री योग्य आहे अशा संस्था ना कामे प्रशासन व फॉर्म देण्यास किंवा स्पर्धेस घेण्यास टाळाटाळ केली जाते . जेणेकरून विभागातील स्थानिक नगरसेविकेच्या कार्यकर्ता लोकांना टक्केवारी मिळतील असा बंदोबस्त  डॉक्टर दबावापोटी वारंवार करत आहे व इतर छोटा संस्थेचा रोजगार जात आहे
हा रफिक कोण ?
रुग्णालयाच्या आवारात ठाण मांडून बसलेला अधिकाऱ्यांच्या कामामध्ये वारंवार दखल देणार हा रफिक कोण असा प्रश्न जनतेकडून कडून विचारले जाते .
   -अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार चौकशी करतील काय ?
   प्रशासकीय अधिकारी खातेप्रमुख विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक  डॉ . संजय  डोळस ,  मुख्य लिपिक गणेश काचणे , लिपिक दिगंबर डोके यांची  चौकशी करण्याबाबत संस्थांनी मागणी केली आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुराडे आणि अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्यय द्यावा अशी मागणी संस्थांची आहे .

error: Content is protected !!