ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कोकणात पाऊस दखल१५ जूनपर्यंत मुंबईत आगमन


सावंतवाडी/ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे काही दिवस अंदमान मध्येच रखडलेला मान्सून आता केरळ आणि तिथून कोकणाकडे सरकला आहे.शनिवारी पहाटे ४ वाजल्यापासून कोकणात पावसाचे आगमन झाल्याने कोकणवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे आता हा पाऊस येत्या १४ ते १५ जूनपर्यंत मुंबईत दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे
महाराष्ट्रात मान्सून पूर्व अवकाळी पाऊस झाला आणि त्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुधा केले.पण त्यानंतर पावसाने दडी मारली खास करून दरवर्षी ७ जूनला पडणार पाऊस यावर्षी मात्र लांबला कारण अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले होते आणि याच चक्रीवादळाने मान्सून ची वाट रोखली होती अंदमान निकोबार बेटां पर्यंत आलेला मान्सून काही दिवस तिथेच रेंगाळला त्यामुळे करलात मान्सूनचे उशिरा आगमन झाले.आता केरालकडून मान्सून पुढे कोकणात सरकला आहे शनिवारी वेंगुर्ला,सावंतवाडी,मालवण आणि कुडाळ या तळ कोकणातील तालुक्यांमध्ये पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या त्यामुळे शेतकरी सुखावला असून आता भटलवणीला सुरुवात होईल तर १५ जूनपर्यंत पाऊस मुंबईत येईल

error: Content is protected !!