ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सोनाली देशमाने रिफ्रेशिंग ब्युटी आणि डिजीटल क्वीन

मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन स्पर्धेत भारतातील ५४ सौंदर्यवतींचा सहभाग

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी)- शारिरीक सौंदर्याला लाभलेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नव्या डिजीटल युगात सामाजिक जाणीवांची जनजागृती करण्याच्या वसा घेतलेल्या मुंबईकर सोनाली देशमाने हिने दिवा ब्युटी पेजेंट्स मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशनच्या पाचव्या सीझनमध्ये ‘रिफ्रेशिंग ब्यूटी आणि डिजीटल क्वीन’ हा पुरस्कार पटकावला. भारताच्या कानकोपर्‍यातून आलेल्या ५४ सौंदर्यवतीच्या या स्पर्धेत मुंबईच्या सोनालीने आपला वाकचातुर्य कौशल्याच्या गुणवत्तेवर यशाचा झेंडा रोवला. नुकतीच ही राष्ट्रीय स्तरीय सौभाग्यवतींची अर्थातच मिसेस इंडियाचे सौंदर्य खुलवणारी ही स्पर्धा पुण्याच्या हायत हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडली.
स्त्रीच्या बाह्यरंगाबरोबर अंतरंग खुलवणार्‍या या स्पर्धेला मुंबई,पुण्यासह भारतातील अनेक छोट्या-मोठ्या शहरातून आलेल्या सौंदर्यवतींनी आपले अनोखे कला-कौशल्य सादर करत दिग्गज परिक्षकांनाही निशब्द करण्याची किमया दाखवली. भारतातून आलेल्या ५४ सौभाग्यवती सौंदर्यवतींच्या बुद्धिमत्ता, कलात्मकता आणि सामाजिक जाणीवांवर प्रकाश टाकणारा हा सौंदर्य सोहळा अत्यंत दिमाखदार ठरला. विशीपासून साठी गाठलेल्या ब्यूटी क्वीन्सचा या स्पर्धेतील सहभाग मन प्रसन्न करणारा होता.
चार दिवस रंगलेल्या या दिवा पेंजेट्सच्या सौंदर्य स्पर्धांत स्पर्धकांना सुंदर दिसण्यासह उत्कृष्ट सादरीकरण, हजरजबाबीपणा, रॅम्पवॉक, आत्मविश्वासपूर्ण संवाद साधण्याची कला कशी जोपासायची, आत्मसात करायची याचेही प्रशिक्षण दिवा पेंजेंट्सचे आधारस्तंभ असलेल्या अंजना आणि कार्ल मस्करेन्हास यांनी दिले. सिने अभिनेत्री इशा कोप्पीकर, मेघना नायुडू, हायत हॉटेलचे संदीप सिंग, डॉ. लीना गुप्ता या परिक्षकांच्या पॅनलने भारतातील ब्यूटीजना त्यांच्या कलागुणांसाठी निवडण्याचे कौशल्य यशस्वीपणे साकारले.

error: Content is protected !!