ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

हेस्टरचे उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढले

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) – भारतातील पशु आरोग्यसेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या हेस्टर बायोसायन्सेस लिमिटेडने. जून २०२० ला संपलेल्या तिमाहीत १२.२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून ६० टक्क्यांनी वाढ दर्शवित आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण महसूल ५८.५१ कोटी रुपये मिळाला असून मागील तिमाहीच्या तुलनेत हे ३८.८८. कोटी रुपये ची वाढ आहे जे एकूण ५० टक्के अधिक होते. तर प्रति शेअर विक्रीतून १४.३८ कोटी रुपये इतकी वाढ दर्शविली आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने चालू आर्थिक वर्षात आपले परिचालन आणि आर्थिक कामगिरी सुधारली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एबिटडा मार्जिन ३१.०२ टक्के आणि निव्वळ नफा २० ९२ टक्के होता. बाजार आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणांनी कुक्कुटपालन आणि गुरेढोरे उद्योगाच्या वाढीस पाठिंबा दिला आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये ते चालू राहण्याची अपेक्षा आहे. अंदाजित विक्री साध्य करण्यासाठी कंपनी भौगोलिक बाजार विस्तार आणि विपणन मनुष्यबळात गुंतवणूक करत आहे..

error: Content is protected !!