ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

एवढी जर भीती वाटत असेल तर सरकार बरखास्त करून घरी सुरक्षित बसा


सध्या महा विकास आघाडीचे सरकार सोडले तर कोरोंनाची भीती कुणाच्याही मनात नाही.आणि भीती बाळगून तरी काय करणार पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी घराबाहेर पाधायला नको का? जे कोरोंनाची i भीती दाखवून कठोर निर्बंध लावत आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आणि सर्व सेवा सुविधा आहेत त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही आणि कठोर निरबधाच्या या दुष्ट चक्रात जो माणूस भरडला जातोय त्याची सरकारला काही पडलेली नाही.त्यामुळे सरकारकडून चुकीचे आणि अन्यायकारक निर्णय घेतले जात आहेत.तब्बल १५ महिन्यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी लोकल ट्रेनच्या प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण अशी मुभा देताना लोकल ट्रेनचे टिकीट मात्र बंद करण्यात आले आहे. याचा अर्थ ज्याच्याकडे पास आहे असाच माणूस लोकल ट्रेनने प्रवास करू शकतो.सरकारचा हा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असाच आहे.कारण ज्याने दोन डोस घेतलेले नाहीत तो यापुढे लोकल प्रवास करू शकणार नाही अशा वेळी समजा एखाद्या गंभीर आजारी माणसाचे मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण तो मुंबईच्या बाहेर राहतो त्याला लोकल ट्रेनच्या प्रवासाची तिकीट मिळणार नाही त्यामुळे त्याने घरातच तडफडून मरायचे का? कसले भिक्कार कायदे करतायत ? कायदा माणसाच्या हितासाठी संरक्षणासाठी करायचा असतो पण हे सरकार तर माणसांच्या जीवावर उठले आहे.समजा एखाद्या माणसाला त्याच्या नातेवाईकाकडे जायचे आहे किंवा लग्न कार्याला जायचे आहे .तर त्याच्यासाठी सरकार गाडी पाठवणार आहे का ? कशासाठी लोकांची एवढी कोंडी करताय? कोरोंनाची एवढी जर भीती वाटत असेल तर सरकार बरखास्त करून घरी सुरक्षित बसा पण लोकांना त्रास होईल असे नियम कायदे करू नका.

error: Content is protected !!