ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

बिल्डर लॉबीने दादर मधील कोळी बांधवांच्या पोटावर पालिकेकडून पाय


मच्छी मार्केट तोडल्याने ४०० कोळी बांधवांचे हाल
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता या मुंबईचा मुळ मालक असलेला कोळी बांधवच विस्थापित होत आहे.कारण भाईंदर ,बोरिवली,मालाड, मुलुंड,या गुजराती पट्ट्यातील शाकाहारी गुजराती मारवाडी लोकांना मासळीची अलार्जी आहे .त्यामुळे त्यांच्या दबावापोटी पालिका प्रशासन आता मच्छीमारांना हटविण्याच्या मागे लागले आहे .क्रॉफर्ड मार्केट येथील मच्छी मार्केट तोडल्यानंतर पालिकेने नोटीस न देता दादरच्या सेनापती बापट मार्गावरील मच्छी मार्केट तोडले .या मार्केटमधील मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसायिकांना मासळी पुरवली जात असे आणि त्यावर ४०० मच्छीमार , वितरण आणि कामगार पोट भरतं होते पण येथून जवळच असलेल्या फुले मार्केट मधील व्यावसायिकांना अचानक या मासळी बाजाराची करणे देऊन पालिका प्रशासनावर दबाव टाकून हे मार्केट तोडायला लावले. यामागे बिल्डर लॉबी असल्याचा मच्छीमारांना संशय आहे .या मच्छीमारांना नवी मुंबईतील येरोली येथे शिफ्ट करण्यात आले .पण तिथले कोळी बांधव त्यांच्या धंद्यावर परिणाम होईल म्हणून या मच्छीमारांना तिथे धंदा करायला मज्जाव करीत आहेत त्यामुळे विस्थापित झालेल्या या ४०० मच्छीमार बांधवांनी आता जगायचे कसे असा प्रश्न ते सरकारला विचारीत आहेत.शिवसेना मराठी माणसाच्या हक्कासाठी निर्माण झाली आज पालिकेत त्यांची सत्ता आहे असे असताना या मुंबईचा मुळ भूमिपुत्र असलेल्या मराठी माणसावर अन्याय होतोय असा आरोप इथले मच्छीमार करीत आहेत
.

error: Content is protected !!