ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक वज्रेश्वरी शाखेचा दैनंदिन व्यवहार वाढणार! , कामकाजात शाखा व्यवस्थापकांचे विशेष लक्ष!

 भिवंडी दि 12(आकाश गायकवाड ) तालुक्यातील वज्रेश्वरी येथील दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा पूर्वीपासूनच आहे.या बँकेचे कार्यक्षेत्र मोठे आहे.याचे कारण सर्व सामान्य लोकांची म्हणजेच,विशेषतः शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते.या शाखेचे व्यवस्थापक ठाणे येथील रहिवासी असणारे रविंद्र पाटील ,यांनी काही दिवसांपासून आपल्या शाखा व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.त्यांची एकूण कामाची पद्धत आणि खातेदारांबरोबर सुसंवाद पाहिल्यावर आम्हां सारख्या जाणकार खातेदारांना अशी खात्री आहे की,यापुढील बँकेचे  दैनंदिन व्यवहार चांगल्या प्रकारे वाढणार ,असे शाखा व्यवस्थापक यांच्या कामकाजावरून खातेदारांना दिसून येत आहे.

         कोणतीही बँक म्हटली म्हणजे,आर्थिक दृष्टीकोनातून व्यवसाय करणारी संस्था असते.अशा संस्थेचा कर्मचारी वर्ग यांच्या स्वभावगुणांवर बरेच काही अवलंबून असते.सद्यस्थितीत शाखा व्यवस्थापक रविंद्र पाटील ,हे अत्यंत मनमिळाऊ,सुस्वभावी आणि आपल्या शाखेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांबरोबर आपुलकीने वागणारे अधिकारी नव्हे तर,एक कुटुंब प्रमुख म्हणून,मैत्रीपूर्ण भावनेने आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी सध्या निभावत असताना,आमच्या खातेदारांच्या निदर्शनास येत आहे.त्याचबरोबर बँकेत कार्यरत असणारे कॅशियर राजकुमार पाटील यांनी तर,आपल्या मानवतावादी सुस्वभावाने परिसरातील खातेदारांची जणू मनेच जिंकून घेतली आहेत,असे म्हणणे वावगे ठरणार नाही.तसेच शाखेतील ज्युनिअर लिपिक संतोष पिंगळे,वैष्णवी भोईर व  चतुर्थ श्रेणी कर्मचारी अमोल पाटील,जयश्री पाटील,मयूर पाटील आदि सर्व कर्मचारी प्रत्येक खातेदारांशी सौजन्याने वागून,उत्तम प्रकारे खातेदारांना बँकींग सेवा पुरवित  असल्याचे आमच्या अनेक वर्षांपासूनच्या अनुभवातून दिसून येत आहे.

        दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वज्रेश्वरी ही फार पूर्वीपासून कार्यरत असल्यामुळेच या शाखेत ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी,अकलोली,गणेशपुरी,उसगाव,भिवाळी,महाळूंगे,घोटगाव,वेढे,झिडके,अंबाडी,दिघाशी,कुंदे  अशी असंख्य  लहान- मोठी गावे.तसेच पालघर जिल्ह्यात परंतु वज्रेश्वरी नजीक असणारी गावे केळठण,गोराड,चांबळे,डाकिवली,लोहपे,अंबरभुई,नांदणी,गायगोठा,निंबवली,सायवन,भिनार,मेढे,आंबोडे अशा बहुसंख्य गाव खेड्यापाड्यातील वज्रेश्वरी शाखेमध्ये शेतकरीवर्ग,महिला बचतगट,शिक्षक व इतर खात्यातील कर्मचारीवर्ग,छोटे-मोठे व्यवसायिक या शाखेतून खातेदार म्हणून विविध स्वरूपाची कर्जे घेऊन,आपापल्या गरजा भागवीत आहेत.आणि सध्या या शाखेला लाभलेले शाखा व्यवस्थापक रविंद्र पाटील ,यांच्या कुशल कामगिरीमुळे बँकेचा दैनंदिन व्यवहार भविष्यात वाढणार,अशी असंख्य जाणकार खातेदार अपेक्षा व्यक्त करीत असतानाच,अशा प्रकारच्या बँकेतील गुणवान व कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचारी यांची विशेष दखल बँकेचे चेअरमन-राजेंद्र पाटील  आणि संचालक मंडळ यांनी घेऊन,त्यांच्या नोकरीत भविष्यात उत्तम सेवा करण्यासाठी प्रेरणा द्यावी,अशी जनमानसातील भावना आहे.

error: Content is protected !!