ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कोविड काळातील अपयशामुळे रुपानिणा हटविले भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री


करोनाचा पहिला राजकीय बळी
गांधीनगर/ गुजरात मधील भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली पक्षांतर्गत धुसफूस आणि करोना काळातील सरकारचे चुकलेले नियोजन याला तत्कालीन मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना जबाबदार धरून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवली आणि त्यांच्या जागी फारसे चर्चेत नसलेले पण पाटीदार समाजात चांगले वजन असलेले भूपेंद्र पटेल यांच्याकडे भाजप नेतृत्वाने गुजरातची धुरा सोपवली आहे . त्यामुळे भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील आणि बहुदा आज ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा तऱ्हेने कोरोनाने विजय रूपांनी यांच्या सारख्या निष्ठावान भाजप नेत्याचा राजकीय बळी घेतला आहे .
पुढील वर्षी गुजरात मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.मात्र कोरोनामुळे गुजरातचे भयंकर नुकसान झाले .मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना करोना काळातील परिस्थिती व्यवस्थित हाताळता आली नाही त्यामुळे गुजरात मधील जनता सरकारवर नाराज होती जनतेची ही नाराजी विधानसभा निवडणुकीत पक्षाला भारी पडू शकते याचा अंदाज मोदी आणि अमित शाह यांना आला होता त्यातच रूपांनी यांच्यावर नाराज असलेला भाजपचां एक मोठा गट सातत्याने नेतृत्व बदलाची मागणी करीत होता या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्वाने रुपणीना हटवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शनिवारी रूपांनी यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला . त्यानंतर गुजरातचा मुख्यमंत्री कोणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तीन बडे नेते होते यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया, पुरुषततम रुपाला,उप मुख्यमंत्री नितीन पटेल आणि भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता पण केंद्रीय नेतृत्वाने सगळ्यांनाच धक्का दिला आणि गुजरातमध्ये संख्याबळाच्या दृष्टीने खूप मोठा समजल्या जाणाऱ्या पाटीदार समाजाकडे गुजरातचे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आणि फारसे चर्चेत नसलेले भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार काल गुजरात भाजपा विधी मंडळ पक्षाची बैठक झाली या बैठकीत मावळते मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी विधी मंडळ पक्षाच्या नेतेपदी भूपेंद्र पटेल यांचे नाव सुचवले आणि त्याला सर्वांनी पाठींबा दिला पुढच्या वर्षी होणाऱ्या गुजरात निवडणुकीत पाटीदार समाजाकडे नेतृत्व देऊन या समाजाचा नेता म्हणून उदयास आलेल्या हार्दिक पटेल याला शह देण्यात आलाय त्यासाठी करोनाचे नीमित पुढे करून विजय रूपांनी यांचा राजकीय बळी देण्यात आला यालाच म्हणतात बेरजेचे राजकारण

error: Content is protected !!