ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची ४० लाखाची फसवणूक

मुंबई -(प्रतिनिधी): नवी मुंबईतील घणसोली गावात राहणाऱ्या एका महिलेला म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून उल्का ठाकूर व ईश्वर पुंडलिक तायडे या दोघांनी मिळून रोख २० लाख रुपये व ३० तोळे सोन्याचे दागिने असे मिळून ३५-४० लाख रुपयांची फसवणूक केली. त्याच्यामुळे आज माझ्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जुबेदा आदम गोठेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली .
जुबेदा गोठेकर या मुंबई सेंन्ट्रल येथील एस.टी. महामंडळ
वरिष्ठ कारकून म्हणून काम करत होत्या . २०१५ मध्ये
त्या सेवानिवृत्त झाल्या . त्यानंतर त्यांना भविष्य निर्वाह निधीचे आणि ग्रॅच्युएटीचे २० लाख रुपये मिळाले . मुंबईत घर नसल्याने त्यांनी मंत्रालयात २ टक्के कोट्यातून घर मिळण्यासाठी अर्ज केला . मंत्रालयातून त्यांना घर लागल्याचे सांगून तेथील लिपिक चिपळूणकर यांनी मुख्यमंत्री याची सही घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. मी त्यांना ५ लाख रुपये दिले . मात्र त्यानंतर तो लिपिक पुन्हा भेटलाच नाही . याच दरम्यान उल्का ठाकूर या महिलेची ओळख झाली. ठाकूर यांनी मी म्हाडा मध्ये कामगार असून तुम्हाला घर मिळवुन देणार ,असे सांगून माझ्याकडून २ लाख १५ हजार रुपये उककळे. तिनेच माझी ईश्वर पुंडलिक तायडे या व्यक्ति सोबत ओळख करू दिली. तायडे यांनी कुर्ला येथे म्हाडाच्या दोन बिल्डिंग असून एका घराची किंमत १० लाख रुपये आहे.तुम्ही मला २० लाख रुपये द्या, मी तुम्हाला घराच्या दोन फायली देतो असे सांगितले .मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तायडे यांना
१५ लाख रुपये रोख व ३० तोळे सोन्याचे दागिने दिले . परंतु त्यांनी मला घर दिले नाही. माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मी पोलीस ठाण्यात धाव घेतली . पोलिसांनी त्याला दमबाजी केल्यावर तायडे यांनी ६-६ लाखाचे दोन धनादेश दिले मात्र ते दोन्ही धनादेश वटलेच नाही . ते बोउन्स झाले. याबाबत मी शिवडी कोर्टात ईश्वर पुंडलिक तायडे यांच्या विरोधात कलम १३८ नुसार दावा दाखल केला. कोर्टात दावा दाखल केलयानंतर ते फक्त एकदाच कोर्टात हजर झाले . त्यानंतर ते सतत गैरहजर असत. कोर्टाने त्यांच्यावर पाच- सहा वेळा वॉरंट काढले . व चार वेळा प्रॉक्लोमेशन काढले. तरी पोलीस मला सहकार्य करीत नाही असा आरोप करून जुबेदा गोठेकर म्हणाल्या की, माझी या दोघांनी आर्थिक फसवणूक केली असून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली . सद्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहेत.

error: Content is protected !!