७० वर्षांवरील जेष्ठांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला . आयुष्मान भारत योजनेंतर्गत आता ७० वर्षांवरील जेष्ठ नाग्रीकानाही या योजनेचा अतिरिक्त लालाभ मिळणार आहे
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ६ कोटी वृद्ध लोक याचा लाभ घेत आहेत. ते म्हणाले की, घरातील एकापेक्षा जास्त वृद्ध व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, आयुष्मान योजनेंतर्गत मिळणारे ५ लाख रुपये समान भागांमध्ये विभागले जातील. अशा प्रकारे कुटुंबाला वर्षाला फक्त ५ लाख रुपये मिळतील. ते म्हणाले की, सेवानिवृत्त कर्मचारी किंवा सीजीएचएस अंतर्गत उपचारासाठी मदत घेणारे लोक आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्यासाठी त्यांना सरकारकडून अगोदर मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेणे सोडावे लागेल. म्हणजे लाभार्थ्याला दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा अधिकार असेल. त्यांनी सांगितले की, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे. सध्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळतो. पण केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे साडेचार कोटी कुटुंबातील सुमारे ६ कोटी अतिरिक्त लाभार्थी या योजनेत समाविष्ट होणार आहेत.