उद्यान कंत्राटदारांची मुजोरी वाढण्याचे कारण कंत्राटदाराच्या सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये दडले आहे
मुंबई- महापालिका मुजोर कंत्राटदाराने पुन्हा 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या – उद्यानाची देखभाल रखडणार
मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे तीनशेहून अधिक उद्याने मैदाने वाहतूक बेटे यांच्या देखभालीसाठी मे महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या पण पालिकेने अंदाजीत केलेल्या दरापेक्षा मुजोर कंत्राटदाराने 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या त्यावर राजकीय पक्षांनी त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण केले. स्थायी समिती मंजुरीसाठी सादर केल्यानंतर तो फेटाळला जाण्याची शक्यता आहे परिणामी उद्यानाची देखभाल रखडनार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्यान कंत्राटदारांची मुजोरी वाढण्याचे कारण कंत्राटदाराच्या सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये दडले आहे
कोविड काळाच्या पूर्वी सेक्युरिटी डिपॉझिट रक्कम निविदा भरतानाच द्यावयाची होती परंतु कोविड काळाचा विचार करून सत्ताधार्यांनी आणि विरोधकांनी मिळुन ही अट शिथिल केली. त्याप्रमाणे ज्याला कंत्राट लागेल त्यावेळेस त्यांनी सिक्युरिटी डिपाझटची रक्कम भरावी असा आदेश काढला. या आदेशाचा फायदा उठवत कंताटदार एकमेकावर कुरघोडी करत चाळीस टक्के कमी दराने निविदा भरण्याची मुजोरी करत आहे. याला पायबंद घालायचा असेल तर पुन्हा होती तशी अट लावल्यास या मुजोरीला आळा बसेल याकडे स्थायि समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि महापौर किशोरी पेडणेकर लक्ष देतील का?