आता नवाब मलिखही ई डी च्या जाळ्यात – वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ७ ठिकाणी छापे
पुणे/ रोज उठून पत्रकार परिषद घेणारे आणि कोणावर ना कोणावर आरोपांची चिखलफेक करणारे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हे सुधा आता ई डी चां चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या वक्फ बोर्डाच्या ६हेक्टर जमिनीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वक्फ बोर्डाची नाही असे दाखवून ती बिल्डरांना विकण्यात आली असून तिथे आता औरंगाबाद चां काही व्यावसायिकांनी टॉवर बांधले आहेत असा आरोप मुस्ताख शेख यांनी केला असून तब्बल ९कोटी ६० लाखांचा हा जमीन घोटाळा आहे .त्यामुळे काल ई डी ने मुंबई पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणच्या व्यावसायिकांच्या घरावर छापे टाकले वक्फ बोर्डाची जमीन केवळ भाडे तत्वावर देता येते विकता येत नाही असे असताना ही जमीन विकण्यात आली .दरम्यान वक्फ बोर्डाच्या कारभार हा नवाब मलिक मंत्री असलेल्या अल्पसंख्याक खात्याकडे येत असल्याने मलिक सुधा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. मलिक यांनी मात्र मी चौकशीला घबराट नाही असे म्हटले आहे